‘हमासला दहशतवादी संघटना जाहीर करा’

इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी केली मागणी

‘हमासला दहशतवादी संघटना जाहीर करा’

एकीकडे तुर्किश राष्ट्रपतींनी हमास ही दहशतवादी संघटना नसल्याचे जाहीर करत सर्व मुस्लिम राष्ट्रांना या भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेसह ब्रिटन ही पाश्चिमात्य राष्ट्रे आणि युरोपीय देशांनी इस्रायलच्या गाझा पट्टीवरील हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्याचवेळी इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित करा, असे आवाहन भारत सरकारकडे केले आहे.

 

हमास या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायवर नृशंस हल्ला केल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. भारतानेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला १०० टक्के पाठिंबा दिल्याबद्दल इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी आभार मानले आहेत. या हल्ल्याबाबत सर्वांत प्रथम काही मोजक्या देशांनी ठामपणे प्रतिक्रिया देऊन इस्रायलला समर्थन दर्शवले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यामुळे मोदी यांनी दहशतवादाचा निषेध करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल गिलोन यांनी त्यांचे आभार मानले.

 

हे ही वाचा:

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!

जितेंद्र आव्हाडांचे ड्रग्स तस्करांशी संबंध?

ज्योति बने ज्वाला; ठाकरेंचा वाकरे केला…

RSS चा शंभर वर्षांचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार

‘भारत हा आमचा अगदी जवळचा सहकारी असल्यामुळे त्याचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जगभरात भारताच्या नैतिक आवाजाचे मोल आहे. भारताने गेल्या कित्येक वर्षांत दहशतवादाचा सामना केला आहे. भारतात कित्येकांचे बळी या दहशतवादाने घेतले आहेत. त्यामुळे ते जेव्हा दहशतवादाबद्दल बोलतात, तेव्हा त्याला खूप महत्त्व प्राप्त होते. मात्र आता भारताने आमच्या दहशतवादी कारवायांविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हमास या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे,’ असे मत त्यांनी मांडले आहे.

Exit mobile version