बांगलादेशातील हिंदू मंदिरांमध्ये इस्लामिक गुंडांनी दुर्गापूजन सोहळ्यादरम्यान तोडफोड केली आहे. या दंगलीत तीन लोकांचा बळी गेला आहे आणि अनेक जखमी झाले आहेत. २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. असे माध्यमांनी गुरुवारी सांगितले.
बिडीन्युज २४ न्यूज वेबसाइटने म्हटले आहे की, अल्लाह विरोधी/ पैगंबर विरोधी उद्गार काढल्याच्या आरोपानंतर, ढाकापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर कुमिल्ला येथील स्थानिक मंदिर बुधवारी इस्लामिक गुंडांच्या हल्ल्याचे केंद्र बनले. संघर्ष सुरू होताच प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, असे त्यात म्हटले आहे.
चांदपूरच्या हाजीगंज, चॅटोग्रामच्या बांशखली आणि कॉक्सबाजारच्या पेकुआ येथील हिंदू मंदिरांमध्येही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने असे वृत्त दिले की एका टप्प्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अनेक दुर्गा पूजेच्या ठिकाणी हिंदूंवर हल्ल्याच्या घटना वाढू लागल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर हल्ला झाला, असे त्यात म्हटले आहे.
हे ही वाचा:
अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू
लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?
तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव
डेली स्टार वृत्तपत्राने म्हटले आहे की, कुमिल्ला येथील घटनेनंतर चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात जमाव आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याने बुधवारी किमान तीन जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
नंतर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश पोलीस रॅपिड ऍक्शन बटालियन (आरएबी) आणि निमलष्करी दल बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) चे एलिट गुन्हेगारी आणि दहशतवादविरोधी युनिट तैनात करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.