२००४ साली गुजरात मध्ये पोलीस चकमकीत मारली गेलेली तरुणी इशरत जहाँ ही दहशतवादीच होती असा निकाल विशेष सीबीआय कोर्टाने दिला आहे. हा निकाल देताना सीबीआय कोर्टाने या प्रकरणात आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोश मुक्तता केली आहे. कोर्टाच्या निकालामुळे इशरतच्या अनेक समर्थकांचा पर्दाफाश झाला आहे.
इशरत जहाँ हीच्या दहशतवादी असण्यावर आता कोर्टानेही शिक्कमोर्तब केल्यानंतर इशरत समर्थकांमध्ये सुतकी वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इशरत जहाँ या दहशतवादी तरुणीचा २००४ साली गुजरात पोलिसांनी केलेल्या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला होता. इशरत ही लष्कर-ए-तोयबाची हस्तक असून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याच्या कटात ती सामील होती. इशरत जहाँ ही पोलीस चकमकीत मारली गेल्यानंतर हा एन्काऊंटर खोटा होता अशी ओरड करत भारतातील अनेक पुरोगामी विचारवंत, लेखक, पत्रकार, राजकारणी हे पुढे आले होते. त्यांनी इशरतला ‘शाहिद’ घोषित करत त्यांचा मोदीविरोधी अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला होता. पण आता कोर्टानेच निकालातून या सर्वांना सणसणीत चपराक लगावली आहे.
हे ही वाचा:
‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे
अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक
केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी परतावा
इशरतच्या हत्येचा आरोप असलेले पोलीस अधिकारी जी.एल.सिंघल, तरुण बरोट, अनाजू चौधरी यांची विशेष सीबीआय कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात एकूण सात पोलीस अधिकाऱ्यांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता. पण त्यातील चार अधिकाऱ्यांची कोर्टाने आधीच मुक्तता केली होती. बुधवारी निकाल देताना सीबीआय न्यायालयाने इतर तीन पोलीस अधिकाऱ्यांचीही मुक्तता केली आहे. यावेळी कोर्टाने निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की “इशरत जहाँ आणि तिचे साथीदार हे दहशतवादी नव्हते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा समोर नाही.”
कोर्टाच्या या निकालानंतर अनेकांचा बुरखा फाटला आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, लेखिका राणा आय्युब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सध्याचे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात, लेखक राम पुनियानी अशा अनेकांनी गेली अनेक वर्ष दहशतवादी इशरतची बाजू लावून धरत नरेंद्र मोदी यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला होता. आव्हाड यांनी तर ‘शहिद इशरत जहाँ’ या नावाची एक रुग्णवाहिकाही सुरु केली होती.