उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांना राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी खास शैलीत उत्तर दिले.

ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना महाविकासआघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटले की, नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, असा मजकूर त्यामध्ये होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

लपाछुपी, पकडापकडी यासारखे खेळ लहानपणी खेळताना एखाद्यावर राज्य आलं, असं आपण म्हणतो. त्यावरुन शाब्दिक कोटी करणारा एक विनोद सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. तोच राज ठाकरेंनी वाचून दाखवला.

हे ही वाचा:

बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से

भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

भाजपचे नेते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकासआघाडीचे नेते करत असतात. पण सरकार अशाप्रकारे पडायला काय इमारत आहे का? पिलर काढले आणि सरकार पडले असे होणार आहे का? तुमचे मंत्री चुका करतात म्हणूनच विरोधकांना संधी मिळते ना, असे खडेबोल राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सुनावले.

Exit mobile version