लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे गल्लीची निवडणूक लढत आहेत की दिल्लीची हा प्रश्न आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
“उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या काळात प्रचारात जी पातळी गाठलीय, त्यावरुन मला प्रश्न पडतो की, ते दिल्लीची निवडणूक लढवतायत की, गल्लीची निवडणूक. ज्या शब्दांचा ते उपयोग करतात, ज्या प्रकारे पांचट जोक, पांचट टोमणे मारतात, हे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला अशोभनीय आहे, शोभणार नाही,” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“… तर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करतात यावरही देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. “त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत पातळीवर भाष्य केलय, त्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही व्यक्तीगत वक्तव्य केलं तरी, ते काय आहेत आणि मी काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. मी त्यांच्यावर व्यक्तीगत बोलायच ठरवलं, तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी असं करणार नाही. महाराष्ट्रातला प्रमुख नेता आहे. देशात महाराष्ट्रतला प्रमुख नेता म्हणून माझ्याकडे बघतात. मी माझा स्तर ठेवलाय, तो स्तर मी ठेवणार” असं सडेतोड उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
हे ही वाचा:
कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार
एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी
इस्लामवादी हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला
येत्या २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नाशिक येथे मतदान होणार आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून यातील लढती या प्रतिष्ठित आहेत. अशातच पाचव्या टप्प्यातील मुंबईच्या सर्व जागा असून या महत्त्वाच्या टप्प्यात सर्वांच्याचं प्रचाराला धार आली आहे.