सरकार आहे की सर्कस?

सरकार आहे की सर्कस?

राज्य सरकारने १५% शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना!, एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल! असा इशारा प्रविण दरेकर यांनी घेतला आहे.

“‘सरकार’ आहे की, ‘सर्कस’? १५% शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला! काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल!” असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करणार असल्याचं सांगितलं होतं. तर, १० ऑगस्टला यासंदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र, टास्क फोर्सनं आक्षेप घेतल्यानं शाळा सुरु करण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. प्रविण दरेकर यांनी यासंदर्भातही राज्य सरकारव टीका केली आहे.”शाळा सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री घोषित करतात.काल टास्क फोर्स निर्णयाला आक्षेप घेते. निर्णय घेण्यापूर्वीच टास्क फोर्सचा सल्ला का घेतला नाही? पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या टोलवाटोलवीच्या धोरणामुळे त्रस्त झाले आहेत. जनतेची दिशाभूल करु नका, ठोस निर्णय घ्या “ असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

मुंबईत दंड वसुलीसाठी आता ‘ही’ नवी मोहीम

ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

राज्यात आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय. मात्र, मुंबईत परीक्षा रद्द करण्यात आलीय. यावरून देखील दरेकरांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. “मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांचा आदेश, “मुंबईतही शिष्यवृत्तीची परीक्षा घ्या”, मुंबई महापालिकेचा उलटा आदेश,”परीक्षा होऊ देणार नाही.”, असं दरेकरांनी म्हटलं आहे. राज्यभरातील ७ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देतील.मात्र,राज्य सरकारच्या ‘धोरण लकव्या’मुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची संधी हुकेल.मुंबईत रात्री १० पर्यंत बार आणि मॉल सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्तीच्या परिक्षेसाठी फक्त कोरोना आडवा येतो का? पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या ‘धोरण लकव्या’मुळे त्रस्त झाले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

Exit mobile version