राज्यात फक्त काय’द्यायचे’ राज्य आहे का?

राज्यात फक्त काय’द्यायचे’ राज्य आहे का?

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय ‘द्यायचे’ राज्य आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी एकामागोमाग तीन ट्विट करत सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी एकामागोमाग तीन ट्विट करत सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपोरेटे जैसे थे

बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता

७६ वर्षांचा ‘लिटिल बॉय’

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम

दरम्यान, कालच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली होती. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावरून शेलार यांनी टीका केली होती. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून गेले ३ महिने जी वास्तू वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज (५ ऑगस्ट) करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत झाली आणि कार्यक्रमाचं हसं झालं. असा प्रकारचं दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले?, असा सवाल शेलार यांनी केला होता. जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेले ६ वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत ८ वेळा बैठका घेतल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version