“अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली. हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?” अशी टीका भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली.
हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना लावावा काय?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 6, 2021
राज्यमंत्री बच्चू कडू यांना काल अकोला जिल्हा रूग्णालयात मेसचा कारभार पाहून संताप आला अन् रागावलेल्या बच्चू कडू यांनी थेट कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली. बच्चू कडू हे आता मंत्री आहेत, याचा त्यांना बहुदा विसर पडला असावा. स्वतः मंत्री असताना देखील बच्चू कडूयांनी स्वयंपाक्याला थोबाडीत मारली आहे. खरंतर मंत्री झाल्यावर जबाबदारीची जाणीव ठेऊन मंत्र्याने अधिक शालीनतेने वागले पाहिजे. परंतु बच्चू कडू हे सत्तेचा माज चढल्यासारखे वागत आहेत.
राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो?
सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 6, 2021
“राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो? सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘मातोश्री’ जवळ शिवसेनेला धक्का
उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?
बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से
भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे
ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांनी गेल्या ३६ दिवसात राजीनामे दिले आहेत. आजच सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “तिसरी विकेट लवकरच पडणार.” असे विधान केले आहे. त्यामुळे आता बच्चू कडू हेच ते तिसरे मंत्री ठरतात का? याकडे आता सामान्यांचे लक्ष आहे.