ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यावर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारच्या असहिष्णुतेवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर, सोनिया गांधींवरही निशाणा साधला आहे.
“नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्यावरून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ विरोधात बोललात तर सरळ अटकच. सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.
नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट केल्यावरून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.
याचा सरळ अर्थ विरोधात बोललात तर सरळ अटकच. सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय? pic.twitter.com/1rSHfQi5Rs— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 15, 2021
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक
अँटीबॉडी कॉकटेल म्हणजे नेमकं काय?
कोरोना रुग्णसंख्येत ७५ दिवसांचा निचांक
शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?
शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.