संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

हे ही वाचा:

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

संजय राऊत यांनी या पूर्वीही काही वेळा शरद पवार युपीएचे अध्यक्ष व्हावेत असे विधान केले होते. तेंव्हाही काँग्रेसकडून या विधानाचा निषेध केला गेला होता. शिवसेनेसारखे पक्ष हे एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत ते युपीएमध्ये यावेत यासाठी शरद पवारांना युपीए अध्यक्षपद देण्यात यावं असं ते म्हणाले आहेत.

Exit mobile version