राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

कर्नाटकातील भाजपा कार्यकर्त्याने केली होती अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने केंद्र सरकारकडून तपशील मागवला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी हे भारतीय नसून ब्रिटनचे नागरिक आहेत, असा दावा याचिककर्त्याने केला असून, या प्रकरणी न्यायालयाकडे केंद्र सरकारला माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सूर्यभान पांडेय यांना असे निर्देश दिले आहेत की, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती सादर करावी. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

पावसाच्या व्यत्ययामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू

कर्नाटकातील भाजपा कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याला शिशिर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी दाखल केलेल्या याचिकेत शिशिर यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हे भारतीय नाही, तर ब्रिटनचे नागरिक आहेत. त्या आधारावर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा. त्या वेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले होते की, याचिकाकर्त्याने नागरिकत्व कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाकडे याची तक्रार करावी. त्यावर याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. प्राधिकरणाकडे दोन वेळा तक्रार केली, पण कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे याचिका करत आहे.

Exit mobile version