भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी धाड हल्ला केला आहे. खार पोलिस स्थानकाच्या आवारात हा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले आहेत. यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. किरीट सोमैय्या यांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आपला संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलिस स्थानकात गेले होते. तेव्हापरतत असताना सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. किरीट सोमय्या यांची गाडी कार पोलीस स्टेशनच आवारातून बाहेर पडत असताना तिथे उपस्थित असलेल्य शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना बाजूला करत सोमय्या यांच्या गाडीसाठी रस्ता करून दिला. यावेळी सोमय्यांची गाडी जात असतानाच त्यांच्यावर उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून त्यात किरीट सोमय्या जखमी झाले आहेत यांच्या हनुवटीला जखम झाली असून त्यातून रक्त येत आहे.
हे ही वाचा:
‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या चांगलेच संतापले असून मुंबई पोलीस आयुक्त जोपर्यंत येत नाहीत आणि उपस्थित सर्व शिवसेनेच्या गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोवर आपण गाडीतून बाहेर येणार नसल्याची भूमिका सोमय्यांनी घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हे उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का? असा सवाल सोमय्या ज्यांनी केला आहे.
राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी सोमय्या रात्री साडेनऊ वाजता खार पोलिस स्थानकात दाखल झाले. सोमय्या पोलिस स्थानकात गेल्याचे कळताच शिवसेना त्यांच्या विरोधात आक्रमक झाली. खार पोलिस स्थानकाच्या आवारात एकत्र येत शिवसैनिकांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने सुरू केली. तर नंतर सोमय्या यांच्यावर भ्याडपणे हल्ला करण्यात आला.