राज्याच्या गृहखात्यावर कशाचा ‘अंमल’ आहे?

राज्याच्या गृहखात्यावर कशाचा ‘अंमल’ आहे?

“राज्याचे गृहमंत्री झोपलेत आणि राजकीय मतपेटीकडे लक्ष ठेऊन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा आदेशच ‘महाभकास आघाडी सरकार’कडून पोलिसांना मिळालेला आहे.” असा आरोप भाजपा आमदार आणि मुंबई  भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“एनसीबीने कारवाई केली हे उत्तम, परंतु राज्याचा अंमली पदार्थ विरोधी पोलीस विभाग काय करतोय? गृहखाते झोपा काढते आहे काय?” असा सवालही भातखळकरांनी उपस्थित केला आहे. “एनसीबी स्वतःच्या हिताच्या आधारे, मुंबईतल्या हाय सी मधल्या क्रूझवर छापे टाकून, ड्रग्ज माफियांना पकडते, ड्रग्ज घेणाऱ्यांना पकडते, मग राज्यातलं गृहखातं आणि गृहमंत्री काय झोपा काढतायत? राज्याचंसुद्धा अमली पदार्थविरोधी खातं आहे. हे खातं गेले ६ महिने वर्षभर काय काम करतंय? यांनी आत्तापर्यंत किती माल जप्त केला? माल जप्त करायला किती धाडी घातल्या? एटीएसच्या बाबतीत दिल्लीचे पोलीस येऊन दहशतवाद्यांना पकडतायत आणि मग मुंबई पोलिसांना जाग येतेय. याचं एकमेव कारण, राज्याचे गृहमंत्री झोप्ल्येत आणि राजकीय मतपेटीकडे लक्ष ठेऊन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा आदेशच ‘महाभकास आघाडी सरकार’कडून पोलिसांना मिळालेला आहे. म्हणूनच आर्यन खानच्या समर्थनार्थ जयराम रमेश येतात नाहीतर अजून कुठले प्रवक्ते येतात. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पार लयाला गेलीये. आणि पोलीस केवळ, या राज्य सरकारच्या खंडणी गोळा करण्याच्या कामामध्ये मग्न आहेत, अशाप्रकारची स्थिती आहे.” असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

हे ही वाचा:

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!

‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’

दरम्यान, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खान पुत्र आर्यन खानसह ८ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किल्ला कोर्टात आर्यन खानला आणण्यात आले. तिथे सुनावणी सुरू होती.

Exit mobile version