म्हणे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बापजाद्यांची मालमत्ता आहे का तुमच्या?- अतुल भातखळकर

म्हणे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बापजाद्यांची मालमत्ता आहे का तुमच्या?- अतुल भातखळकर

परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद आज लोकसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे खासदार गिरीश बापट आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही या विषयावर ट्विट करून शिवसेनेला ‘शवसेना’ असे संबोधत घणाघात केला आहे. “संसदेत एका महिला खासदाराला धमकवण्याचा प्रकार शिवसेनेचे रूपांतर मूल्य संपलेल्या शवसेनेत झाल्याचे द्योतक आहे. म्हणे महाराष्ट्रात फिरू देणार नाही. बापजाद्यांची मालमत्ता आहे का तुमच्या?” अशी जळजळीत टीका अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सुनील देवधर यांनी देखील या प्रकारावर ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेने चा मर्दपणा आता संसदेत महिलांना धमकावण्या पुरताच उरला आहे.” अशा शब्दात देवधर यांनी टीका केली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संबोधून, “महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.” असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

हॉस्पिटलनेच उघडे पाडले देशमुख-पवारांचे पितळ

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी

रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी नार्को टेस्ट करावी; भाजपा आमदाराची मागणी

“आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते.” असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

Exit mobile version