दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ असल्याचे आता समोर आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याचे नाव घेतले आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी, फी माफ करावी अशा काही मागण्या हिंदुस्तानी भाऊने मांडल्या आहेत. त्याने एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’
पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!
शिक्षण मंत्र्यांच्या घराला आंदोलक विद्यार्थ्यांनी घेरले
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राहुल गांधी आले आमनेसामने आणि…
ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. हिंदुस्तानी भाऊ हे उद्या वर्षा गायकवाड यांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या ते मंत्र्यांसमोर मांडणार आहेत.