25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणभारताच्या पराभवाने काँग्रेस झाली खुश?

भारताच्या पराभवाने काँग्रेस झाली खुश?

Google News Follow

Related

काल रविवार २४ ऑक्टोबर रोजी आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप (ICC MEN’S T20 WC) मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला. भारतावर दहा गडी राखून मात करत पाकिस्ताने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजया सोबतच पाकिस्तान संघाने विश्वचषकात पहिल्यांदा भारताला हरवण्याची कामगिरी केली. या पराभवामुळे एकीकडे भारतीय जनता दुःख व्यक्त करत असतानाच काँग्रेस मात्र हा पराभव साजरा करत असल्याचे म्हटले जात आहे. याला कारणीभूत ठरले आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेरा यांचे ट्विट.

पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर राधिका खेरा यांनी त्यांच्या व्हेरीफाईड ट्विटर खात्यावरून हे वादग्रस्त ट्विट केले आहे. “क्यों भक्तों, आ गया स्वाद? करवा ली बेइज़्ज़ती ???” असे राधिका यांनी म्हटले आहे. यावरून ट्विटरवर नवा वाद सुरु झाला असून राधिका यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. राधिका यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी कुठेही भारतीय क्रिकेट संघाचा उल्लेख केला नसला तरी या ट्विटची वेळ बघता ते भारतीय क्रिकेट संघाला उद्देशून असल्याचे म्हटले आहे. यावरून नेटकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला चांगलेच झोडपले असून भारताच्या पराभवाने आणि पाकिस्तानच्या विजयाने काँग्रेस पक्षाला आनंद होतो का? असा सवाल समाज माध्यमांवर विचारला जात आहे. तर काँग्रेस पक्ष भारतीय संघाऐवजी पाकिस्तानी संघाला पाठिंबा देतो का? असेही विचारले जात आहे.

हे ही वाचा:

…आणि Paytm चे CEO कार्यालयातच लागले नाचायला

नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

कोण आहेत राधिका खेरा?
राधिका खेरा या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक आहेत. तर या आधी त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाची जबाबदारी होती. त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे दिल्ली विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा