समीर वानखेडेंवरील आरोपांची एनसीबी करणार चौकशी

समीर वानखेडेंवरील आरोपांची एनसीबी करणार चौकशी

मुंबई क्रूझ पार्टी ड्रग्स प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर एनसीबीचे डिडिजी अशोक जैन यांनी साईलचे ऍफिडेविट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यानंतर आता याप्रकरणी नुकतीच चौकशी सुरू झाली आहे, असे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

‘आमच्या दक्षिण- पश्चिम विभागातून आम्हाला एक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार नुकतीच चौकशी सुरू झाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी ही चौकशी योग्य रितीने हाताळतील. पण, कोणत्याही अधिकाऱ्यावर अशी टिप्पणी करू नये’, असे ज्ञानेश्वर सिंह म्हणाले. त्यासाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे. प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र महासंचालकांडे दिले असल्याने त्यात ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

भारताच्या पराभवाने काँग्रेस झाली खुश?

…आणि Paytm चे CEO कार्यालयातच लागले नाचायला

नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची डील करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप प्रभाकर साईलने केला आहे. तसेच या प्रकरणातील आठ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांना जाणार होते. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचेही साईलने म्हटले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  त्यानंतर एनसीबीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहेत.

Exit mobile version