कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी

एसआयटी स्थापन झाल्यानंतर प्रथमच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाकडून चौकशी

कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी

मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर प्रथमच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

करोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कारभारा संदर्भात कॅगचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या कॅग अहवालात मुंबई महापालिकेच्या करोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. हा अहवाल समोर आल्यानंतर भाजपाकडून या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून जून महिन्यात या सगळ्या कारभाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता (नियोजन) सुनील राठोड यांच्या दालनात हे एसआयटीचे पथक दाखल झाले होते. त्या ठिकाणीसुद्धा या पथकाने या विभागातील कारभारासंदर्भात चौकशी केली होती.

तर, सोमवार, १७ जुलै रोजी एसआयटी पथकाने सुधार विभागातील सह- आयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारासंदर्भात चौकशी केली. आर्थिक गुन्हे शाखेने कॅगच्या अहवालासंदर्भात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले होते. या अधिकाऱ्यांकडून आर्थिक गुन्हे शाखेने अधिकची माहिती मिळवली असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या सगळ्या चौकशीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचप्रामाणे हा एसआयटी चौकशीचा भाग असून विविध विभागांची ही चौकशी सुरु राहणार असून कॅगच्या अहवालानुसार ही चौकशी केली जात असल्याचं देखील ते म्हणाले.

हे ही वाचा:

वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान

भारत इंडोनेशियात आता डिजिटल तंत्रज्ञान व्यवहार

नोव्हाक जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणत कार्लोस अल्कराझ विम्बल्डन विजेता

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

काय आहेत ईडीचे आरोप?

महापालिकेची जंबो कोविड केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्सचं अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब ईडी चौकशीतून उघडकीस आली. तसेच पालिकेचे जंबो कोविड केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीनं केला आहे.

Exit mobile version