मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेचा साथीदार असलेल्या सुनील मानेचे शिवसेनेशी असलेले धागेदोरे तपासावेत, अशी मागणी आज भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी एनआयएकडे केली आहे. याविषयीची माहिती देणारा एक व्हिडिओसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी सुनिल माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा अशी मागणी मी आज NIA कडे पत्राद्वारे केली.
मानेची सख्खी बहीण व भावोजी शिवसेनेचे नगरसेवक होते. पत्रा चाळीतील रहिवाशांना धमकवण्यासाठी मानेचा वापर करण्यात आला होता अशी माझी माहिती आहे. pic.twitter.com/pbYCuZcgJo— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 29, 2021
“मनसुख हिरेन प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर सुनील माने यांना अटक केल्यानंतर, त्यांच्या शिवसेना कनेक्शनच्या चौकशीची मागणी मी एनआयएला पत्र लिहून केली आहे. सुनील माने यांची सख्खी बहीण ही गोरोगाव पश्चिमेतील शिवसेनेची नगरसेविका होती आणि त्यांचे पती सुद्धा शिवसेनेचे चार टर्म नगरसेवक होते. त्यांचे दुसरे भाऊ हे गोरेगावमध्येच पश्चिमेला राहतात. पत्रा चाळ प्रकरणामध्ये लोकांना धमकावण्यात सुनील माने यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. शिवसेना नगरसेविका आणि त्यांचे पती यांचासुद्धा या सगळ्या पत्रा चाळ प्रकरणामध्ये मोठा सहभाग होता. त्यामुळे पत्रा चाळ, पीएमसी बँक, मनसुख हिरेन हत्या प्रकरण या सगळ्याशी शिवसेनेचं कनेक्शन हे स्पष्ट दिसतंय. या संपूर्ण शिवसेना कनेक्शनची एनआयएने सखोल चौकशी करावी, अशी मागणी मी आज पत्राद्वारे केलेली आहे.” असे अतुल भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा:
आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत
लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा
सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे
“मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी सुनिल माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा अशी मागणी मी आज एनआयएकडे पत्राद्वारे केली. मानेची सख्खी बहीण व भावोजी शिवसेनेचे नगरसेवक होते. पत्रा चाळीतील रहिवाशांना धमकवण्यासाठी मानेचा वापर करण्यात आला होता अशी माझी माहिती आहे.” असे ट्विटही भातखळकरांनी केले.