27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा५४ कारखान्यांची चौकशी व्हावी

५४ कारखान्यांची चौकशी व्हावी

Google News Follow

Related

चंद्रकांत पाटील गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार

जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यामुळे या ५४ साखर कारखान्यांचे संचालक आणि कारखान्यांशी संबंधित राजकारणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. ५४ साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. जरंडेश्वर तर हिमनगाचं एक टोक आहे. या ५४-५५ कारखान्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी अमित शहा यांच्याकडे पत्रं लिहून मागणी करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं. भाजपाच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर ही प्रकरणं काढायला कुणी अडवलं? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. मी पत्रं लिहू नये हे सांगणं सुद्धा एक प्रकारची हुकूमशाहीच आहे, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीत भाजपा नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे ते नेहमी दिल्लीत जात असतात. ते तिकडे कुणाला भेटले त्याबद्दल माहीत नाही, असं सांगतानाच राऊत हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते एकमेव नेते आहेत. शिवसेनेकडे त्यांच्या व्यतिरिक्त बाकी नेते नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स

भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम

रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम

तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जरंडेश्वरवरच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने ४९ साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही ४ हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं हजारे म्हणाले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे, असंही ते म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा