विद्यापीठ अनुदान आयोगाने इतिहासाच्या पदवीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. यात भारतीय संस्कृती, धर्म यांना देखील स्थान देण्यात आले आहे. परंतु यावरून काही तथाकथित बुद्धिजीवींनी आक्षेप घेतला आहे.
इतिहासाच्या पदवीचा (बीए) पहिला पेपर भारताच्या संकल्पनेवर (आयडिया ऑफ भारत) आधारित आहे. यात वेद, वेदांत, उपनिषदे, स्मृती, पुराणे यांना देखील स्थान देण्यात आले आहे. त्याबरोबरच यात ‘हडप्पा संस्कृती’ ऐवजी ‘सरस्वती संस्कृती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याबरोबरच आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत देखील नाकारण्यात आला आहे. त्याउलट तैमुर, बाबर यांचा उल्लेख आक्रमक असा करण्यात आला आहे. मुस्लिम शासकांचा उल्लेख आक्रमक असा करण्यात आल्याने काही बुद्धीजीवींकडून यावर विरोध दर्शवण्यात येत आहे. यापुर्वी सरस्वती संस्कृती असा उल्लेख नव्हता असा आक्षेप घेण्यात येत आहे. तर सिंधु-सरस्वती संस्कृती या नावाने, या संस्कृतीतील सलगता दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे देखील मत काही तथाकथित बुद्धीजीवींनी केले.
हे ही वाचा:
कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन
चोवीस तासांत वाढले ३१,८५५ नवे कोरोना रुग्ण
मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बीएच्या आणखी एका पेपरमध्ये रामायण आणि महाभारताचा देखील अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. त्यावरूनदेखील आक्षेप घेतला जात आहे. या अभ्यासक्रमात मुघलांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. त्यावरून देखील अनेक बुद्धीजीवींनी आक्षेप घेतला आहे. या अभ्यासक्रमातून हिंदु- मुस्लिम समाजातील तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे देखील म्हटले जात आहे.
ही टीका करणाऱ्यांत असदुद्दीन ओवैसी यांचा देखील समावेश आहे. त्यांनी सरकार शिक्षणाद्वारे हिंदुत्ववादी विचारधारा आणू पाहत आहे अशी टीका ट्वीटरवरून केली आहे. त्याबरोबरच या अभ्यासक्रमातून इतिहासाचे भगवेकरण होत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.