राज्यभरात धुळवडच्या रंगात सर्व जण रंगून गेल्याचं दिसून येत आहे. सेलेब्रिटीपण रंग उधळत आहे. राजकीय नेतेही धुळवड खेळत आहे .मुंबई भाजपने रंग बरसे धुळवडीचे आयोजन केलं आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक रंगफेक करत धुळवडीचे किस्से सांगत विरोधकांना टोला लगावला.“अनेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटं सांगून. भांग वगैरे पाजून दिली. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं. कुणी रडत होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा” असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
“मला एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक…!”असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकात्मक फुगा फोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे मुंबईतच धुळवड साजरी करत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्याचवेळी ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?
आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”
आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’
इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर
आता आमचा बदला हा आहे की
देवेंद्र फडणवीसांनी राजकीय विरोधकांचा बदला घेण्यासंदर्भात विधान केले होते. याबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले, आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिलाय. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नाही.