भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील

पवारांऐवजी हे नेते 'भारत जोडो यात्रे'त सामील होणार

भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी पक्षाचे आणखी काही नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शरद पवार या पदयात्रेत सामील होणार की नाही या बद्दल माहीत नसल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. तसेच १० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

त्याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रे’त त्यांचा सहभाग हा प्रकृतीवर अवलंबून आहे. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून निघालेली पदयात्रा ६१ व्या दिवशी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांना पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या यात्रेत सहभागी होणार असल्याचे पवार यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार

टीम इंडियाने गोलंदाजांसाठी सोडल्या बिझनेस क्लास सीट्स

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

बसमुळे पाय कापलेल्या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष

पण आरोग्याच्या इतर समस्या आणि ताप यामुळे पवार यांना नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी शनिवारी डॉक्टरांसह मुंबई ते शिर्डी असा प्रवास केला आणि पक्षाच्या अधिवेशनाला थोडक्यात संबोधित केले. माजी मुख्यमंत्री चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांच्या कार्यक्रमात काही बदल झाला आहे. परंतु सर्व काही पवार साहेबांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही खासदार राहुल यांच्या यात्रेत सहभागी होणार होते पण आता उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रा दरम्यान पळ काढताना दिसत आहेत. मात्र या यात्रेत उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

Exit mobile version