प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

येत्या अधिवेशनात इंडियाऐवजी भारत असा बदल केला जाण्याची शक्यता, काँग्रेसचा संताप

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने जी-२० परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या आमंत्रणात प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे तर प्रेसिडेन्ट ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे प्रचंड चर्चा देशभरात सुरू झाली आहे.    

 

काँग्रेसने यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी एक्सवर मेसेज करत म्हटले आहे की, बातमी खरी ठरली तर… राष्ट्रपती भवनातून जी २० च्या भोजनासाठीचे निमंत्रण वितरित करण्यात आले. त्यावर प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेन्ट ऑफ भारत असा उल्लेख आहे.    

 

जयराम रमेश पुढे म्हणतात की, आता संविधानातील आर्टिकल १ मध्ये इंडिया अर्थात भारत याऐवजी भारत अर्थात इंडिया हे संघराज्य आहे. असा उल्लेख येईल. पण आता संघराज्येही धोक्यात आलेली आहेत. जयराम रमेश यांच्याकडून ही टिप्पणी आल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्वशर्मा यांनी रिपब्लिक ऑफ भारत : आपली संस्कृती ही अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल करते आहे, याचा सार्थ अभिमान आहे, असा संदेश लिहिला.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

गोव्यातून आलेला बनावट मद्याचा साठा जप्त !

गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत

विरार वसई भागात धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश ! 

संविधानात भारताचा उल्लेख इंडिया असा आहे. मात्र आता त्याजागी भारत असा उल्लेख बदलला जाण्याची शक्यत आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होत असून त्यात या मुद्द्यावर चर्चा होण्याची आणि इंडियाऐवजी भारत असे नाव बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे राज्यसभेतील खासदार नरेश बन्सल यांनी इंडियाऐवजी भारत असा उल्लेख बदलला गेला पाहिजे अशी मागणी केली होती. इंडिया या शब्दातून वसाहतवाद आणि गुलामीचे दर्शन होते. भाजपाचे दुसरे खासदार हरनाथ सिंग यादवा यांनीही याला दुजोरा दिला. हरनाथ सिंग म्हणाले होते की, संपूर्ण भारतात याचीच चर्चा आहे की, आता आपण इंडिया हे नाव बदलून सगळीकडे भारत असाच उल्लेख करायला हवा. भारत हे आपल्या संस्कृतीचे चिन्ह आहे. आपल्या संविधानात त्यासाठी बदल व्हायला हवा.  भारत हा शब्द संविधानात समाविष्ट केला गेला पाहिजे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपण इंडियाऐवजी भारत असे बोलायला हवे असे आवाहन केले होते.

Exit mobile version