भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यासोबत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी नेते किरीट सोमय्या यांच्यासह अनेक कार्यकर्ते मढमधील स्टुडिओची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.

भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

गुरुवारी पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनात भाजपा आमदार अतुल भातखळकर, अमित साटम यांनी मढ येथील अनधिकृत स्टुडिओचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आज, २६ ऑगस्टला भाजपा नेत्यांनी मालाड पश्चिमेच्या मढ येथील स्टुडिओची पाहणी केली आहे. मुंबईच्या मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला माजी मंत्री अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यामध्ये १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यासोबत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी नेते किरीट सोमय्या यांच्यासह अनेक कार्यकर्ते मढमधील स्टुडिओची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.

अनधिकृत स्टुडिओ तोडल्याशिवाय येथून जाणार नसल्याची भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे. ते म्हणाले, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी स्टुडिओचा दौरा केला होता. २८ कमर्शिअल बांधकाम, १० लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयानं याकरीता परवानगी अधिकृत परवानगी दिली होती. आरे संदर्भात एवढं धत्तिंग केलं, इथे तुम्हाला पर्यावरण दिसलं नाही का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. कोव्हिड काळात बांधकाम केलं हे आदित्य ठाकरेंना दिसलं नाही का? तिकडे परबचा रिसोर्ट तुटणार आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

उरीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

२०२१ मध्ये या स्टुडिओचा परवाना संपला होता. मग पुढे कोणाच्या आदेशाने परवानगी दिली होती? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. अतुल भातखळकर म्हणाले, १ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. चौकशीचे आदेश दिले आणि कोणाच्या आदेशाने परवानगी दिली होती. अनधिकृत स्टुडिओ ताबडतोब तोडले पाहिजे आणि कारवाईचे आदेश दिल्याशिवाय हलणार नसल्याचे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

Exit mobile version