लखनौ येथे एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या कन्हैय्याकुमारच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली. कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कन्हैय्या कुमारचे आगमन लखनौमधील काँग्रेसच्या कार्यालयात झाले तेव्हा एकाने गर्दीत शिरून कन्हैय्या कुमारच्या दिशेने शाई फेकली आणि कन्हैय्या कुमार मुर्दाबाद, मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे त्या गर्दीत गोंधळ उडाला.
लखनौ मध्य विभागातून निवडणूक लढवणार असलेल्या सदाफ झफर या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी कन्हैय्या कुमार आला होता. त्यावेळी देवांश वाजपेयी याने त्याच्या दिशेने शाई फेकली. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणाऱ्या वाजपेयीला पकडले.
ही शाई होती असे एका गटाचे म्हणणे आहे तर एका गटाने हे ऍसिड होते असे म्हटले आहे. पण या घटनेनंतर त्या गर्दीत गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की सुरू झाली. त्यात कन्हैय्या कुमारच्या अंगावर मात्र ते द्रव्य उडाले नाही. त्याला बाजुला काढण्यात कार्यकर्त्यांना यश आले.
Just in
Man throws some sort of chemical at #KanhaiyaKumar inside #Congress party office premises in #Lucknow.
Members of NSUI caught the youth. He has been identified as Devnash Vaypaee@kanhaiyakumar @INCUttarPradesh pic.twitter.com/CTqluM91Ou
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) February 1, 2022
काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे ऍसिड असल्याचे म्हटले आहे. त्याचे काही थेंब आसपासच्या युवकांच्या अंगावर उडाल्याचे बोलले जात होते. कन्हैय्या कुमार कम्युनिस्ट पक्षातून सध्या काँग्रेसचा नेता म्हणून काम करत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी तो प्रचार करत आहे.
हे ही वाचा:
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव
निलंबन रद्द झालेल्या भाजपाच्या आमदारांनी ठेवले विधानसभेत पाऊल
Budget 2022 : गंगाकिनारी रसायनमुक्त शेतीला देणार चालना
नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा
सदाफ झफर ही उत्तर प्रदेश निवडणुकीत उमेदवार आहे. २०१९मध्ये सीएए आंदोलनात भाग घेतलेल्या झफरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. सध्या ती जामिनावर आहे.