राकेश टिकैतवर शाईफेक

राकेश टिकैतवर शाईफेक

किसान आंदोलनात अग्रणी असणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. सोमवार, ३० मे रोजी कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे हा प्रकार घडला. बंगलोरमध्ये टिकैत हे पत्रकार परिषद घेत होते. या वेळी त्यांच्यावर स्थानिक लोकांकडून शाईफेक करण्यात आली.

उपस्थितांकडून असे सांगण्यात येते की राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करणारे हे कर्नाटक मधील शेतकरी नेता चंद्रशेखर यांचे समर्थक, कार्यकर्ते होते. पत्रकार परिषद सुरू असताना जेव्हा राकेश टिकैत यांना चंद्रशेखर यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यावर राकेश टिकैत यांनी आपला त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले. यावरून चंद्रशेखर यांचे समर्थक टिकैत यांच्यावर भडकले आणि त्यांच्यावर शाईफेक केली.

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

भाजपचा तिसरा उमेदवार, सातवा उमेदवार आल्याने स्पर्धा

‘घोडेबाजार करण्याचा प्रश्नच येत नाही’     

या घटनेनंतर बंगलोरमध्ये भरपूर राडा पाहायला मिळाला राकेश होते त्यांच्या समर्थकांनी शाही फेकणार यांना धरून चोप दिला तर त्यानंतर उपस्थितांमध्ये दोन गटांमध्ये एकमेकांवर खुर्च्याही फेकण्यात आल्या या घटनेनंतर पोलिसांनी ती गजानना ताब्यात घेतल्याचे माहिती समोर येत आहे

दरम्यान या घटनेवरून राकेश टिकैत यांनी कर्नाटक सरकारवर आरोप केले आहेत. कर्नाटक सरकारने सुरक्षेची खबरदारी घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर सरकारने आपल्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली नसल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपही राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Exit mobile version