राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

संसद परिसरात गदारोळ

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

संसदेचे हिवाळी अधिवेश सध्या सुरू असून गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी- विरोधकांमध्ये गदारोळ चालू आहे. या दरम्यान, धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे, माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फर्रुखाबादमधील भाजप खासदार मुकेश राजपूत यांना पायऱ्यांजवळ ढकलून दिल्याचा आरोप केला जात आहे. सध्या खासदार मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते मुकेश राजपूत यांच्या धक्काबुक्कीमुळे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांच्या अंगावर पडल्याने सारंगी हे जिन्यावरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ६९ वर्षीय भाजप खासदाराला व्हीलचेअरवर बसवून बाहेर आणावे लागले, तेथून त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले.

खासदार प्रताप चंद्र सारंगी म्हणाले की, “मी संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभा असताना मागून आलेल्या राहुल गांधींनी एका खासदाराला ढकलले आणि तो खासदार माझ्या अंगावर पडल्याने मी सुद्धा पडलो.” दरम्यान, या घटनेत खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे, पदभार स्वीकारला!

आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी

स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…

अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी- शर्ट घालून लोकसभेत गेले होते. राहुल गांधी यांनी धक्काबुक्कीबाबत स्पष्टीकरण दिले असून, ते म्हणाले, “मी सभागृहात जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा भाजप खासदारांनी रस्ता अडवला. ही संसद आहे, इथे धक्काबुक्की करून काहीही होत नाही. आम्ही संसदेच्या आत जात होतो. भाजपचे खासदार आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत. संसदेत जाणे हा माझा अधिकार आहे. मला कोणीही रोखू शकत नाही. मला संसदेत जायचे होते पण मला थांबवण्यात आले. भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला प्रवेशद्वारावर थांबवण्याचा प्रयत्न करत होते,” असे राहुल गांधी म्हणाले.

Exit mobile version