माजी राष्ट्रपती झैल सिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग भाजपावासी

माजी राष्ट्रपती झैल सिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग भाजपावासी

भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग हे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले आहेत. सोमवार १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडून असे जाहीर केले गेले की एक महत्त्वाची व्यक्ती पक्षात प्रवेश करणार आहे. तेव्हापासूनच ही व्यक्ती कोण असणार याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तविली जात होती. दुपारी १ वाजता हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत इंद्रजीत सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. इंद्रजीत सिंग यांना भारताचे माजी राष्ट्रपती तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री राहिलेले झैल सिंग यांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे इंद्रजीत सिंग यांचा चेहरा पंजाब विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाला फायद्याचा ठरू शकतो.

हे ही वाचा:

नाशिक हादरले! महिलेची दुचाकी अडवून बलात्कार

रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार?

बाप रे! मुंबईत ७ महिन्यांत घडले ५५० बलात्काराचे गुन्हे

अस्वस्थ करणारी राजकीय बधीरता…

२०२२ च्या सुरुवातीलाच देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. पंजाब हे त्यापैकीच एक राज्य. पंजाबमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सध्याच्या स्थितीला भाजपाची पंजाबमधील स्थिती कमजोर मानली जात आहे. वर्षानुवर्षांचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल यांनी साथ सोडल्यानंतर भाजपा पंजाबची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे आत्ताचे चित्र आहे. भाजपा पंजाब मधील सत्तेच्या शर्यतीत नाही असा दावा अनेक जण करताना दिसत आहेत. पण तरीदेखील राज्यात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील दिसत आहे. त्यानुसार विविध पातळींवर पक्ष प्रवेश सुरू झाले आहेत.

Exit mobile version