कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!

कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!

गेल्या ७० वर्षात भारतात लस निर्मितीचे एखाद दोन यशस्वी प्रयोग झाले. कोविडची कठीण परिस्थिती असताना सुद्धा इतक्या कमी काळात कोवीशिल्ड या लसीची निर्मिती प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद बाब आहे. कोविड संकटातून संधी शोधत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणा-या भारताने हे शक्य करून दाखवले. आज १६ जानेवारी २०२१ रोजी १३० कोटी भारतीयांची प्रतिक्षा समाप्त झाली असून देशात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेला प्रारंभ झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १०.३० वाजता व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. भारताची लसीकरण मोहीम जगातील सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेवर चौफेर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी ट्विट करत नरेंद्र मोदी आणि भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.

“गेल्या ७० वर्षांत लस निर्मितीच्या क्षेत्रात भारताने प्रगती केली नव्हती. गेल्या १० वर्षांत १-२ लसींची निर्मिती आपण केली. पण त्या तुलनेत कोविड सारख्या कठीण काळात भारताने केलेली कोविशील्ड या लसीची निर्मिती ही एक गौरवास्पद बाब आहे.” असे मत केईएम रुग्णालयाच्या माजी डीन डॉ. निलीमा क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

भारताचा शेजारी असलेल्या भूतानचे पंतप्रधान लोते शेरिंग यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि समस्त भारतीयांचे अभिनंदन केले आहे. या महामारीत आपण जे भोगले त्याला हे लसीकरण उत्तर ठरेल अशी मी आशा करतो.

तर भारताचा धडाकेबाज माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने देखील ट्विट करत कोविड लसीचे स्वागत केले आहे. “कोविड विरुद्धच्या लढाईत भारताच्या अभिमानास्पद उत्तरात ही लस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हे खरे हिरो आहेत.” असे युवराजने म्हटले आहे

तर सुपरस्टार अनिल कपूर याने “वेल डन इंडिया….टुगेदर इज बेटर असे आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.


पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील लसीकरण मोहिमेचे कौतुक करताना लसीकरण मोहिमेत एकत्र येऊन  निश्चय करायचे आवाहन  देशाला केले आहे.

 

पत्रकार बरखा दत्त यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून भारताचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कर्मचारी यांना सलाम केला आहे.

Exit mobile version