रशिया- युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली होती शिवाय मदतीचे आवाहन देखील केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी हिंसेचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने चर्चा करावी असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिला आहे.
संघर्षात होत असलेल्या आणि झालेल्या जीवितहानी वित्तहानीबद्दल मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांनी झेलेन्स्की यांच्याकडे चिंता व्यक्त केली. त्यांनी युक्रेनच्या राष्ट्रपतींना भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे आणि त्वरीत बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याचे आवाहन देखील केले.
हे ही वाचा:
‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तिकेचे प्रकाशन
नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर ठाकरे सरकारचा सूड
फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात
‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेसंबंधी सांगितले. त्यांच्या देशावर एक लाखाहून अधिक रशियन सैनिकांनी हल्ला केला आहे. हा हल्ला रोखण्यासाठी त्यांनी भारताकडे मदतीचे आवाहन केले होते असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या चर्चेनंतर भारताची भूमिका काय असणार आहे याकडे मात्र संपूर्ण जागाच लक्ष आहे. भारताने यापूर्वीही दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. रशिया भारत संबंध चांगले असल्यामुळे जगाची देखील भारताकडून अपेक्षा आहे. मात्र, भारताने या प्रकरणात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.