‘तमाम भारतीय इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे’

रणजित सावरकर यांचे परखड मत

‘तमाम भारतीय इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे’

भारताच्या फाळणीच्या वेळेस इस्लामी जिहादींनी केलेले अत्याचार आम्ही आजही विसरलेलो नाही. याच अत्याचाराची पुनरावृत्ती आज इस्रायलमध्ये होत आहे. १४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामी आक्रमकांनी ज्यूना इस्रायलमधून बाहेर काढले त्यांनतर २०-३० वर्षांनी भारतात सिंधवर इस्लामी आक्रमकांनी चाल केली. त्यामुळे भारतीय इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. कारण आपल्या परंपरा एकच आहेत, अशा शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष व स्वा. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी इस्रायल हमास युध्दाबाबत आपले परखड मत व्यक्त केले.

 

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला २३ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात इस्रायलचे काँसुल जनरल कोबी शोनानी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले तसेच अमृतसरच्या सुवर्णमंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जी तलवार अर्पण करण्यात आली होती, तिचेही पूजन करण्यात आले. त्यावेळी रणजित सावरकर बोलत होते. इस्रायलवर जो पाशवी हल्ला करण्यात आला आहे, त्यानंतर सुरू झालेल्या युद्धात इस्रायलच विजयी होईल, असा विश्वास सावरकर यांनी व्यक्त केला.

 

ते म्हणाले की, भारत आणि इस्रायल यांचे शत्रू एकच आहेत. ज्यू विस्थापित झाल्यावर ते भारतात आले, इथेच ते एकजीव झाले. आजही त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. अनेक मराठी भाषा बोलणारे ज्यू इस्रायलमध्ये आहेत. मला अभिमान आहे की ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.

हे ही वाचा:

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

११ वर्षांनंतर पुन्हा तेच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन उत्साहात

 

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, सदस्य के. सरस्वती, कमलाकर गुरव, दीपक कानुलकर आणि परराष्ट्र संबंध विषयातील तज्ज्ञ अनय जोगळेकर उपस्थित होते.

Exit mobile version