‘बीबीसी’ च्या एका कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात नरेंद्र मोदी यांच्या ९९ वर्षीय आईचाही अपमान करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतीयांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून ट्विटरवर ‘बॉयकॉट बीबीसी’ असा ट्रेंड चालवला जात आहे.
एक मार्च रोजी बीबीसीच्या एशियन नेटवर्कवर एक रेडिओ कार्यक्रम घेण्यात आला होता. ब्रिटनमधील शीख समुदायाशी संबंधित हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची सूत्रसंचालक प्रिया राय ही कार्यक्रमात दर्शकांचे फोन कॉल्स घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत होती. यातच सायमन नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला. या कॉलवर सायमनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईवरून शिवीगाळ केली आहे.
हे ही वाचा:
बीबीसीची सूत्रसंचालक प्रिया राय हिने सायमनला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. अखेर हा फोन कॉल बंद करण्यात आला. नंतर बीबीसी तर्फे हा कार्यक्रम एडिट केला गेला आहे. त्यातील हा शिवीगाळीचा भाग काढून टाकण्यात आला आहे. ‘ब्रिटिश इंडियन्स व्हॉईस’ या ट्विटर हॅन्डलने या कार्यक्रमातील आक्षेपार्ह भाग ट्विट केला आहे. यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात आली.
या घटनेची भारतीयांना प्रचंड चीड अली असून याचे पडसाद ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. ट्विटरवर ‘बॉयकॉट बीबीसी’ हा ट्रेंड क्रमांक एक ला सुरु आहे. आत्तापर्यंत ५९ हजार पेक्षा जास्त ट्विट्स या विषयात करण्यात आली असून हा आकडा दर मिनिटाला वाढत आहे.