26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपुणेकरांना मोदी सरकारची 'थेट' भेट

पुणेकरांना मोदी सरकारची ‘थेट’ भेट

Google News Follow

Related

एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरु केला आहे. या लसीचा पहिला हफ्ता शुक्रवारी पुण्यात दाखल झाला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही खुशखबर पुणेकरांना दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील अंदाजे ६०% कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातही सगळ्यात वरती आहे तो पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पण अशातच पुणेकरांना आता थेट केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होणार आहे.

हे ही वाचा:

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’

या लसींचा पहिला हफ्ता शुक्रवारी पुण्यात पोहोचला. या पहिल्या हफ्त्यात पुणे जिल्ह्याला २ लाख ४८ हजार लसी पुरवण्यात आल्या आहेत. तर रविवारी लसींचा दुसरा हफ्ता मिळणार असून यात १ लाख २५ हजार लसी असणार आहेत. या लसींपैकी ४०% लसी पुणे शहराला, ४०% लसी पुणे ग्रामीणला तर २०% लसी या पिंपरी-चिंचवडला मिळणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून या र्निणयासाठी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

एकीकडे ठाकरे सरकार लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रावर आरोप करताना दिसत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचे म्हणत आहे. महाराष्ट्रात लसीचा पुरेसा पुरवठा होत नाहीये. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून त्या प्रमाणात लसी पाठवल्या जात नाहीयेत. लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडत आहेत असे आरोप केंद्र सरकारवर होत आहेत. पण अशा परिस्थिती केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारच्या आरोपांना कृतीतून दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा