खुशखबर! रेमडेसिवीरचे उत्पादन वाढणार…मोदी सरकारचा मोठा निर्णय

खुशखबर! रेमडेसिवीरचे उत्पादन वाढणार…मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोविडच्या उपचारात अतीशय महत्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचे भारतातले उत्पादन आता वाढणार आहे. हे उत्पादन वाढवण्यासाठी मोदी सरकारने ठोस पाऊले टाकत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी आता सात नव्या साईट्सना परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांनी बुधवारी ही खुशखबर राज्यातील जनतेला दिली.

कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा देशात जाणवत आहे. देशातील कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रेमडीसीवरची मागणीही प्रचंड वाढली आहे. रेमडेसिवीरची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी. याच परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने काही दिवसांपूर्वी या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात आता या इंजेक्शनची उत्पादन वाढण्यासाठी मोदी सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यासाठी सात नव्या साईट्सना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता रेमडेसिवीरचे उत्पादन १० लाखांनी वाढणार आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?

ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधूनच ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात?

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

तसेच रेमडेसिवीरची किंमतही कमी करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. विशेष म्हणजे रेमडेसिवीरच्या उत्पादकांनी स्वतः पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत या आठवड्याच्या अखेरीपर्यंत ३५०० रुपयांपेक्षा कमी होणार आहे अशी माहिती केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली.

मोदी सरकारच्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसुख मांडवीया यांना धन्यवाद म्हटले आहे. कोविडच्या या कठीण परिस्थितीत हा निर्णय हजारो लोकांचे प्राण वाचवून जाईल असे गडकरींनी म्हटले आहे.

Exit mobile version