भारतीय क्रिकेट टीमची ट्वीटरवर फलंदाजी

भारतीय क्रिकेट टीमची ट्वीटरवर फलंदाजी

भारतीय कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरातून सेलिब्रेटींची अहमहमिका लागली आहे. यांना सडेतोड प्रत्युत्तर देत, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन हॅशटॅग प्रसिद्ध केले. #इंडियाटुगेदर (#IndiaTogether) आणि #इंडियाअगेन्स्टप्रोपोगँडा (#IndiaAgainstPropoganda) अशा दोन हॅशटॅगनंतर अनेक प्रसिद्ध भारतीय कलावंत, खेळाडू यांनी विदेशी सेलिब्रेटिंना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाने यात बाजी मारली आहे. सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर यांनीदेखील या ट्वीटरयुद्धात उडी घेतली. विराट कोहली, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अनिल कुंबळे, शिखर धवन, हार्दिक पांड्या या सर्वांनी हा हॅशटॅग वापरून ट्वीट केले आहे. त्यामुळे ट्वीटर आता या कायद्यां संदर्भातील युद्धाचे केंद्र झाले आहे.

गेल्या वर्षी भारत सरकारने कृषी सुधारणा कायदे मंजूर केले. त्यानंतर गेले दोन महिने तथाकथित शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीची कोंडी करून ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या बहाण्याने आंदोलकांनी दिल्लीत प्रचंड हिंसाचार केला. या हिंसाचारात, ३०० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्याबरोबरच अनेक खाजगी आणि सरकारी वाहनांची मोडतोड करण्यात आली आणि लाल किल्ल्यावर खालिस्तानचा झेंडा फडकवला. त्यानंतर कालपासून परदेशी सेलिब्रेटींनी यात उडी घेतल्यामुळे या वादाला निराळेच वळण प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा: शेतकरी आंदोलन- पॉर्नस्टार, पॉपस्टार विरुद्ध भारतीय फिल्म स्टारभारतासाठी मास्टर ब्लास्टरची पुन्हा बॅटिंग!

Exit mobile version