शेतकरी आंदोलन- पॉर्नस्टार, पॉपस्टार विरुद्ध भारतीय फिल्म स्टार

शेतकरी आंदोलन- पॉर्नस्टार, पॉपस्टार विरुद्ध भारतीय फिल्म स्टार

अमेरिकेतील काही प्रसिद्ध गायक, ‘कलाकार’ आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले. या सगळ्यांच्या ट्विटना उत्तर म्हणून आता भारतातील अनेक अभिनेतेही एकजूट होत आहे. भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने टाकलेल्या इंडिया टुगेदर (#IndiaTogether) या हॅशटॅगवर अनेक कलाकार आता ट्विट करत आहेत.

भारतात राजधानीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलने सुरु आहेत. या मुद्द्यावर गेले दोन महिने आंतरराष्ट्रीय ‘सेलिब्रिटी’ गप्प होते. पण आता अचानक सर्वांनाच या विषयावर माहिती मिळाल्यागत हे सेलिब्रेटी ट्विट करत आहेत. यामध्ये गायिका रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि पर्यावरण प्रेमी ग्रेट थुंबर्ग यांचा समावेश आहे.

या विषयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले होते आणि एक हॅशटॅग देखील सुरु केला होता. याच्या समर्थानात अनेक कलाकारांनी आता ट्विट करायला सुरवात केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी रिहानायांचा एक फोटो टाकून ‘डाव्यांचा आदर्श’ असे ट्विट केले. तर गायक कैलाश खेर यांनी भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कारस्थान सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तर प्रज्ञान ओझा यांनी माझ्या देशाला शेतकऱ्यांचा अभिमान आहे. असे सांगितले आहे. तर अजय देवगण यांनी खोट्या माहितीला बाली पडू नका असे सांगितले.

Exit mobile version