भारताने २०२१ मध्ये विविध क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे योजले आहे. यात बॅलास्टिक मिसाईल डिफेन्स (बी.एम.डी), पाणबुड्यांसाठी उच्च दर्जाची एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (ए.आय.पी) ड्रोन आणि यात ८०० कि.मी पल्ला असणाऱ्या ब्रम्होससह विविध क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
हे ही वाचा: संरक्षण मंत्रालयाचा ‘मेक इन इंडिया’ चा नारा….
सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार येत्या वर्षात पाणबुड्यांना अधिक शक्तिशाली करणाऱ्या ए.आय.पीची पुढील वर्षी चाचणी होईल. त्या वर्षात चाचणी होऊ घातलेल्या यंत्रणांपैकी ती एक महत्त्वाची यंत्रणा आहे. ही यंत्रणा संपूर्ण भारतीय बनावटीची असून, पाणबुड्यांना अधिक काळासाठी पाण्याखाली राहण्याची क्षमता या ए.आय.पी.मुळे प्राप्त होईल.
याव्यतिरिक्त ब्राम्होसच्या दुसऱ्या टप्प्याची देखील चाचणी घेण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज होईल. याच क्षेपणास्त्राच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी मागील वर्षी घेण्यात आली होती.
रुस्तम-२ या भारतीय बनावटीच्या अनमॅन्ड एरिअल व्हेइकल (यु.ए.व्ही)ची देखील चाचणी अपेक्षित आहे. ही चाचणी २०२१ च्या पहिल्या सहामाहीत होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प विलंबीत झाला आहे. विविध यंत्रणांनी युक्त असलेले रुस्तम-२ संरक्षण सिध्दतेसाठी उपयुक्त आहे.
इशान्य सीमाप्रश्नावरून भारत-चीन एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे भारत स्वसंरक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भारताची होऊ घातलेली तयारी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.