अफगाणिस्तानच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी

अफगाणिस्तानच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी

अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या या भूकंपात सुमारे एक हजार लोकांचा मृत्यू झाला असून १ हजार ५०० लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.अफगाणिस्तानच्या लोकांच्या कठीण काळात भारत शक्य तितक्या लवकर मदत देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाच्या बातमीने अत्यंत दुःख झाले आहे. या भूकंपामध्ये अनेक लोकांनी जीव गमावला आहे, पंतप्रधान मोदींनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, अफगाणिस्तान लोकांच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. शक्य तितक्या लवकर भारत अफगाणिस्तानला आपत्ती निवारण साहित्य पुरवठा करेल, असेही पंतप्रधान मोदींनी ट्विट मध्ये लिहले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी आपले बस्तान हलविले वर्षातून मातोश्रीवर

मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले

अफगाणिस्तानमध्ये झालेला भूकंप अत्यंत तीव्र होता, त्या भूकंपाचे धक्के पाकिस्तानातही जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १ हजार ५०० लोक जखमी झाले आहेत.

Exit mobile version