विरोधी पक्षाने हिंदुत्वावर केलेल्या टीकेवर काँग्रेसवर हल्ला सुरू ठेवत, भाजपने शनिवारी दावा केला की काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते. कारण शरियाच्या तरतुदी तेव्हा कायदेशीर व्यवस्थेचा भाग होत्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या उपाययोजनांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापेक्षाही जास्त महत्व होते.
भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आरोप केला की, त्रिपुरामध्ये मशिदींना लक्ष्य केल्याच्या “खोट्या” बातम्यांवरून महाराष्ट्रात झालेला हिंसाचार, सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि हिंदुत्वावर हल्ला करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्या हिंदू धर्माविरुद्धच्या मोठ्या कटाचा भाग आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना, त्यांनी सवाल केला की विरोधी पक्षाचे नेते महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाची बदनामी करण्याचे आणि जातीय तेढ आणि हिंसाचार भडकवण्यासाठी संघटित मोहीम चालवण्याचे प्रशिक्षण देत आहेत का?
राज्यातील एका प्रशिक्षण शिबिरात काँग्रेस कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यात फरक करण्याचा प्रयत्न केला होता आणि हिंदुत्वावर हल्ला केला होता.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादी इस्लामी संघटनांशी केल्याने भाजपा आक्रमक झाला आहे. त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेस तुष्टीकरणाच्या राजकारणाचे प्रतीक आहे आणि हिंदू धर्माविरुद्ध द्वेष पसरवते आणि दंगली घडवते.
हे ही वाचा:
हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’
‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’
शिवाजी महाराजांच्या राजवटीचा हिंदू धर्माशीही संबंध होता हे लक्षात घेऊन त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींसारखे नेते ही संकल्पना समजू शकत नाहीत. त्याचबरोबर महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या पक्षातील दिग्गजांविषयी त्यांनी राहुल गांधींना वाचायला सांगितले.
ते पुढे म्हणाले, नेहरूंनी लिहिले होते की ‘हिंदू’ हा शब्द भारतीय अस्मितेच्या व्यापक संदर्भात समजला जाऊ शकतो आणि त्याला संकुचितपणे पाहिले जाऊ नये.