भारत-ब्रिटन लावणार खलिस्तान्यांवर चाप

भारत-ब्रिटन लावणार खलिस्तान्यांवर चाप

ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात झालेल्या छोट्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दहशतवादविरोधी आणि काही विशिष्ट फुटीरतावादी संघटनांकडून अतिरेकी कारवायांवर लगाम लावण्याची गरज या मुद्द्यांवर चर्चा झाली.

सोमवारी रात्री युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) मधील २६व्या परिषदेच्या (COP26) जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी असे सांगितले की, “यूकेमध्ये खलिस्तानी समर्थक कारवाया करणार्‍या फुटीरतावादी गटांच्या भारतीय कारवाया हे दोन्ही नेत्यांमधील चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांपैकी एक होते.

ही बैठक छोटी होती, पण त्यामध्ये वाढत्या कट्टरतावादावर आपल्या दोन्ही देशांच्या चिंतेवर अल्प चर्चा होऊ शकली, असे श्रृंगला म्हणाले. “सध्या ज्या विषयांवर आपण दहशतवाद आणि कट्टरतावादावर चर्चा करत आहोत, (खलिस्तानी दहशतवाद) त्या विषयाला खरंतर जमिनीवर कोणीच विचारात नाही. परंतु तरीही या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव उत्पन्न झाला आहे. त्यामुळे याविषयावर चर्चा करण्यात आली.” असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

आसाममध्ये भाजपाला निर्भेळ यश

पंतप्रधान जॉन्सन यांना असे वाटले की यापैकी काही गटांना लगाम घालणे आवश्यक आहे. स्पष्टपणे, लोकशाही किंवा घटनात्मक नसलेल्या अशा कारवायांना कसे रोखले जाऊ शकते हे पाहण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Exit mobile version