भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित केले पाहिजे असे मत केरळमधील आमदाराने मांडले आहे. विशेष म्हणजे हा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाहीये तर केरळमधील ‘केरला जनपक्षम’ या पक्षाचा आमदार आहे. केरळ मधील पी.सी. जॉर्ज या आमदाराने ही मागणी केली आहे. जॉर्ज हे केरळमधील पूंजर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर ते ‘केरला जनपक्षम’ या केरळमधील स्थानिक राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत.

केरळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून केरळमधून आता ‘हिंदूराष्ट्राची’ मागणी ऐकू येऊ लागली आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सोसायटी या सामाजिक संस्थेने केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील थोदूपुर्झा येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. केरळचे आमदार पी.सी.जॉर्ज हे या कार्यक्रमात भाषण करत होते. यावेळी आपल्या भाषणात “दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करण्यात यावे” असे विधान जॉर्ज यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी केरळमधील डाव्या पक्षांवर सडकून टीका केली.

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

ममतांना निवडणूक आयोगाचा दणका

ठाकरे सरकारच्या अकार्क्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

केरळमधील एलडीएफ आणि युडीएफ या दोन्ही डाव्या आघाड्या दहशतवादाचे समर्थन करतात. २०३० पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र व्हावे यासाठी त्या दहशतवादी संघटनांना समर्थन देतात असे जॉर्ज म्हणाले. यावेळी जॉर्ज यांनी नोटबंदीचेही समर्थन केले. २०१६ मध्ये मोदींनी नोटबंदी केल्यामुळे बाहेरून येणार पैशाला चाप बसला आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना पुढे ढकलावी लागली असे जॉर्ज म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात जॉर्ज ह्यांनी लव जिहाद संदर्भातही भाष्य केले. लव जिहादचा धोका खरा आहे आणि तो केरळमध्ये अस्तित्वात आहे. धर्मांतर करण्यासाठी खोटे विवाह करण्याच्या अनेक घटना केरळमध्ये घडल्याचे जॉर्ज म्हणाले.

Exit mobile version