पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील अनेक क्षेत्रातील निर्यातीदारांचे अभिनंदन केले आहे. याचे कारणही तितकेच महत्वाचे आहे. भारताने पहिल्यांदाच अनेक वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी लोकांचे, विशेषत: शेतकरी, विणकर, एमएसएमई, उत्पादक आणि निर्यातदार यांचे अभिनंदन केले. कारण भारताने प्रथमच चालू आर्थिक वर्षात चारशे अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे.
भारताने चालू आर्थिक वर्षात चारशे अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष ठेवले होते. आणि ते मोदी सरकारच्या काळात प्रथमच पूर्ण झाले आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी सर्व क्षेत्रातील निर्यातीकरांचे अभिनंदन करत हे त्यांचे श्रेय असल्याची त्यांना जाणीव करून दिली. आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमातील यशाकडे जाण्याचा हा पहिला महत्वाचा पल्ला असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर सांगितले आहे.
India set an ambitious target of $400 Billion of goods exports & achieves this target for the first time ever. I congratulate our farmers, weavers, MSMEs, manufacturers, exporters for this success.
This is a key milestone in our Aatmanirbhar Bharat journey. #LocalGoesGlobal pic.twitter.com/zZIQgJuNeQ
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022
जानेवारीमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोहिल यांनी याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, “चालू वर्षातील निर्यातीचे लक्ष्य गाठण्याच्या टप्प्यावर आपण पोहचत आहोत. सर्व भारतीयांना लवकरच हे लक्ष्य गाठल्याची माहिती मिळेल. पंतप्रधान मोदी निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देत आहेत.”
हे ही वाचा:
तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं
‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’
‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’
‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या नऊ महिन्यात भारताची निर्यात ३३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली होती. डिसेंबर महिन्यात भारताने ३७ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. ही निर्यात चालू आर्थिक वर्षातील सर्वाधिक होती. आणि गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत सुमारे ३७ टक्क्यांनी या डिसेंबरमध्ये वाढ झाली. हे आर्थिक वर्ष संपायला अजून आठ दिवस बाकी आहेत. त्या आधीच भारताचे निर्यातीचे लक्ष्य पूर्ण झाले आहे.