‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून अनेक महत्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

मन की बातच्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्यासमोर खूप सर्वात मोठे ध्येय असो किंवा अत्यंत कठीण आव्हान असो, भारतातील लोकांची सामूहिक शक्ती आणि एकता कोणतेही आव्हान लीलया पेलू शकते. पंतप्रधान म्हणाले की, दोन-तीन वर्षांपूर्वी देशाच्या पश्चिमेला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचे आपण पाहिले होते. यादरम्यान जोरदार वारा आणि पाऊस झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये प्रचंड हानी झाली परंतु कच्छच्या लोकांनी ज्या प्रकारे धैर्याने आणि सज्जतेने अशा धोकादायक वादळाचा सामना केला ते खरोखर अभूतपूर्व आहे.

पंतप्रधान म्हणाले की, दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर कच्छ पुन्हा कधीच उठणार नाही, असे म्हटले जात होते, परंतु आज हाच जिल्हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. पीएम म्हणाले की, मला खात्री आहे की कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशातून लवकरच बाहेर येतील. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात भारताने जी ताकद विकसित केली आहे ते आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श उदाहरण बनत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मुळात निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन हा एक उत्तम मार्ग आहे. पावसाळ्यात तर ही जबाबदारी अधिकच वाढते. कॅच द रेन सारख्या मोहिमेद्वारे या दिशेने सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा:

चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा पालिकेला अधिकारच काय?

१८० देशांमधील व्यक्तींसमोर मोदी करणार योग

तुलसीराम यादव यांचा जलसंधारणाचा संदेश

पंतप्रधानांनी लोकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले आणि यूपीच्या बांदा जिल्ह्यातील तुलसीराम यादव यांचे उदाहरण दिले. पंतप्रधानांनी सांगितले की, तुलसीरामजींनी गावातील लोकांना सोबत घेऊन या भागात ४० हून अधिक तलाव बांधले आहेत. पंतप्रधानांनी हापूर जिल्ह्यातील नामशेष झालेल्या नदीचे पुनरुज्जीवन करण्याबाबतही सांगितले आणि म्हणाले की, फार पूर्वी कडुनिंब नावाची नदी होती, जी कालांतराने नामशेष झाली परंतु इथले लोक इतके दृढनिश्चयी होते की या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी निकराने सामूहिक प्रयत्न केले गेले. त्यांनंतर कडुनिंब नदी पुन्हा जिवंत झाली. नदीचे उगमस्थान असलेल्या अमृत सरोवरचाही विकास केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा आदर्श

पंतप्रधान म्हणाले की, नद्या, कालवे आणि तलाव हे केवळ जलस्रोत नसून त्यांच्याशी जीवनाचे रंग आणि भावना जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणीसाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले तेव्हा अनेक भावनिक चित्रे समोर आली होती. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे तसेच त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचे कौतुक केले. विशेषतः शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी बांधलेले किल्ले आजही समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभे आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली, हा मोठा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे, याचा विशेष आनंद असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून नमूद केले. २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याच्या संकल्पाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि सांगितले की १० लाख टीबी रुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. यानंतर मोदींनी जपानच्या मियावाकी तंत्रज्ञानाविषयी सांगितले, ज्याच्या मदतीने सुपीक माती नसतानाही परिसर हिरवागार करता येतो.

‘देशावर आणीबाणी लादण्यात आली’

भारत लोकशाहीची जननी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आम्ही आमच्या लोकशाही आदर्शांना सर्वोच्च मानतो, आमच्या संविधानाला सर्वोपरी मानतो. पण २५ जून ही तारीख आपण कधीही विसरू शकत नाही, जेव्हा ४८ वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील तो काळ काळा होता. मोदी म्हणाले की, त्या काळात अनेक पुस्तके लिहिली गेली, ज्यामध्ये मी ही ‘संघर्ष में गुजरात’ नावाचे पुस्तक लिहिले होते. “भारतातील राजकीय कैद्यांचा छळ” या शीर्षकाच्या पुस्तकात त्यावेळच्या लोकशाहीच्या रक्षकांना मिळालेल्या क्रूर वागणुकीचे वर्णन केले आहे, हे ही उद्धृत करायला पंतप्रधान विसरले नाहीत.

Exit mobile version