‘टीके से बचेगा देश’…भारताचे वॅक्सीन अँथेम ऐकलेत का?

‘टीके से बचेगा देश’…भारताचे वॅक्सीन अँथेम ऐकलेत का?

भारतामध्ये जगातील सर्वात मोठी कोवीड विरोधातील लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे. भारताने या लसीकरण मोहिमेत अनेक विक्रम स्थापित केले असून लवकरच एकूण शंभर कोटी लसी देण्याचा विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर भारत उभा आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर भारतातील कोविड विरोधी लसीकरण मोहिमेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कडून वॅक्सीन अँथेम प्रकाशित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी हे वॅक्सीन अँथेम गायले आहे. शनिवार १६ ऑक्टोबर रोजी हे अँथेम प्रकाशित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या वॅक्सीन अँथेमचे लोकार्पण झाले.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की “पुढच्या आठवड्यात, भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांनी १०० कोटींचा टप्पा गाठण्यात यश मिळवलेले असेल. मार्च २०२० मध्ये जेव्हा देशात टाळेबंदी लागली तेव्हा आपण या महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय सामग्रीसाठी आपण आयातीवर अवलंबून होतो. मात्र थोड्याच कालावधीत या सर्व गोष्टींचे उत्पादन देशात करण्याची क्षमता प्राप्त करून कोणत्याही बिकट प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत.” तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे द्रष्टे नेतृत्व आणि सर्वांनीच दिलेल्या योगदानामुळे हे शक्य होऊ शकले, असेही त्यांनी पुढे सांगितले.

हे ही वाचा:

जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण

‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’

भारताने आत्तापर्यन्त ९७ कोटींपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. तर येणाऱ्या काही दिवसांत भारतात १०० कोटी लसीकरण पार होणार आहे. लवकरच भारतात लहान मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात होणार आहे.

Exit mobile version