इस्रायल- भारत मैत्री अधिक दृढ

इस्रायल- भारत मैत्री अधिक दृढ

दिल्ली बाँबस्फोटांनंतर काहीच दिवसांनी इस्रायलने दिल्लीतील प्रायमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला काही अद्ययावत वैद्यकीय यंत्रे दान करून भारत-इस्रायल मैत्री अधिक दृढ करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

कर्मचाऱ्यांमधील ताळमेळ ठेवणाऱ्या उपकरणांबरोबर, व्हेंटिलेटर देण्याच्या वेळेला इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन मलका म्हणाले, की २०१२ मध्ये धमाका झाल्यानंतर प्रायमस हॉस्पिटलचे सहाय्य अतिशय मोलाचे आणि यशस्वी ठरले होते. खऱ्या मित्रासारखे आम्ही आमच्याकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकमेकांना देतो. इस्रायली दूतावासाच्या सांगण्यानुसार अनेक आर्टिफिशीयल इंटेलिजन्सची अनेक उपकरणे कोविड-१९ सारख्या अनेक आपदांमध्ये अतिशय उपयुक्त ठरतील. त्याबरोबरच एकूणच आरोग्य सुविधांमध्ये लाभकारक ठरतील. इस्रायली दूतावासाच्य प्रसिद्धी पत्रकात असे म्हटल्याचे एएनआयच्या वृत्तानुसार समजते.

याच पत्रकातून २०१२ मध्ये झालेल्या बाँब हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या अनेक इस्रायली अधिकाऱ्यांना या रुग्णालयात उपचार मिळाले असेही समजते. एका अधिकाऱ्याची पत्नी या हल्ल्यात जबर जखमी झाली होती. मात्र या रुग्णालयात तिच्यावर उत्तम उपचार करण्यात आले आणि तीचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले होते.

यावेळी इस्रायलकडून हॉस्पिटलच्या आतील तसेच बाहेरील सुविधांच्या व्यवस्थापनासाठीची यंत्रणा, काही सामान्य चाचण्या वेगाने करण्याची क्षमता असलेली प्रणाली, कुठल्याही ऍंब्युलन्समध्ये वापरता येईल अशी व्हेंटिलेटर प्रणाली, अशा विविध अद्ययावत यंत्रणा प्रदान करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version