29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणभारताकडे जगातील सर्वात मोठा कुशल कामगार पुरवठादार देशांपैकी एक बनण्याची क्षमता

भारताकडे जगातील सर्वात मोठा कुशल कामगार पुरवठादार देशांपैकी एक बनण्याची क्षमता

इंदोरमधील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २१ जुलै रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर येथे भरलेल्या जी- २० देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनिचित्रमुद्रीत संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. रोजगार एक महत्वाचा आर्थिक आणि सामाजिक मुद्दा असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की रोजगार क्षेत्रात काही सर्वाधिक महत्वाच्या बदलांच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. या वेगवान घडामोडीं समजावून घेण्यासाठी, प्रतिसादात्मक आणि परिणामकारक धोरणे आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात तंत्रज्ञान हे रोजगारासाठी महत्वाचे साधन बनले आहे आणि पुढेही तसेच राहिल, असे पंतप्रधान म्हणाले. यजमान शहर इंदोर हे अशा नवीन परिवर्तनाच्या लाटेत उदयाला आलेल्या अनेक स्टार्टअप्सचे माहेरघर आहे असे त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर आणि प्रक्रियेच्या माध्यमातून तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. कौशल्य मिळवणे, रिस्कीलिंग आणि कौशल्यवृद्धी हे भावी मनुष्यबळाचे मंत्र असल्यांचे सांगितले. भारताच्या स्किल इंडिया मिशनचे उदाहरण देत त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून भारतातील १२.५ दशलक्ष युवांना आतापर्यंत प्रशिक्षण मिळाल्याचे नमूद केले. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आणि ड्रोन या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी कोविड महामारीच्या काळात भारताच्या आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी दाखवलेले कौशल्य आणि समर्पण अधोरेखित केले.

भारताकडे जगातील सर्वात मोठा कुशल कामगार पुरवठादार देशांपैकी एक बनण्याची क्षमता असून, भविष्यात जागतिक स्तरावर मोबाईल वर्कफोर्स, अर्थात जगभर सेवा पुरवणारे मनुष्यबळ हे वास्तव बनणार आहे. जी- २० देशांनी, खऱ्या अर्थाने विकासाचे जागतिकीकरण आणि कौशल्याचे आदान-प्रदान करण्यामध्ये बजावलेल्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. कौशल्य आणि पात्रतेच्या निकषावर, व्यवसायांना आंतरराष्ट्रीय संदर्भ देण्यामध्ये सदस्य देशांनी केलेल्या प्रयत्नांची नरेंद्र मोदींनी प्रशंसा केली.

हे ही वाचा:

अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा विराट अवतार

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

रोजगार पुरवठादार आणि कामगारांबद्दलची आकडेवारी, माहिती आणि डेटा सामायिक करण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे जगभरातील देश उत्तम कौशल्य, कर्मचारी नियोजन आणि फायदेशीर रोजगारासाठी पुराव्यावर आधारित धोरणे तयार करण्यासाठी सक्षम होतील. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की परिवर्तनात्मक बदल म्हणजे कामगारांच्या नवीन श्रेणींचे आणि व्यासपीठ अर्थव्यवस्थेचे नवे रूप असून, ते साथीच्या रोगाच्या काळात लवचिकतेचा आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहे. ते म्हणाले की ते कामाची लवचिक व्यवस्था पुरवते आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांसाठी देखील पूरक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा