भाजपविरोधात लढा देण्यासाठी विरोधी पक्षांनी साकारलेला ‘इंडी आघाडी’ने गटाने आता काही टीव्ही कार्यक्रम आणि न्यूज अँकरवर बहिष्कार घातला आहे. त्यांच्याकडून अशा टीव्ही वाहिन्या आणि न्यूज अँकरची यादीच जाहीर करण्यात आली आहे. इंडी आघाडीने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून हीच का इंडी आघाडीची लोकशाहीवादी भूमिका, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीने हा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्ष सातत्याने प्रसारमाध्यमातील एका गटावर त्यांच्यात अडचणी निर्माण करण्याचा आरोप करतो आहे. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही आवश्यकतेपेक्षा अधिक प्रसिद्धी न दिल्याचा आरोपही प्रसारमाध्यमांवर केला होता. यात्रेला सर्वसामान्य लोकांचे समर्थन मिळत आहे, मात्र मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांचा बहिष्कार सुरूच आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
‘ब्लू डार्ट’च्या सेवेचे नवे नाव; आता डार्ट प्लस नव्हे ‘भारत डार्ट’
व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक
इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम
हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड
‘संपादकांनी यात्रेवर बहिष्कार टाकला होता. लाखो माणसे या मोहिमेत सहभागी होत आहेत. तुम्ही एवढ्या मोठ्या मोहिमेला दाखवणार नाही?’, अशी विचारणा गहलोत यांनी केली होती. मे २०१९ मध्येदेखील काँग्रेसने एक महिन्यासाठी टीव्हीवर बहिष्कार घातला होता. काँग्रेसने एक महिन्यासाठी त्यांच्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील डिबेट कार्यक्रमांमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला होता, असे काँग्रेसनेता रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले होते.
इंडी आघाडीने ज्या अँकरवर बहिष्कार घातला आहे त्यांची यादी अशी
आदिती त्यागी (भारत एक्स्प्रेस)
अमन चोप्रा (भारत एक्स्प्रेस)
अमिश देवगण (न्यूज १८)
नाविका कुमार (टाइम्स नाऊ)
अर्णब गोस्वामी (रिपब्लिक टीव्ही)
अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज)
चित्रा त्रिपाठी (आज तक)
गौरव सावंत (आज तक)
आनंद नरसिंहन (सीएनएन न्यूज १८)
प्राची पराशर (इंडिया टीव्ही)
रुबिका लियाकत (भारत २४)
शिव अरुर (आज तक)
सुधीर चौधरी (आज तक)
सुशांत सिन्हा (टाइम्स नाऊ नवभारत)
लोकसभेसह विधानसभेतही आघाडी
‘इंडिया’ हा गट लोकसभा निवडणुकीआधी पहिल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही लढण्याच्या विचारात आहे. अर्थात, याची औपचारिक घोषणा होणे अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगढमध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने आधीच काही जागांवर उमेदवार जाहीरही करून टाकले आहेत.