… खरे स्वातंत्र्य तर २०१४ मधेच मिळाले

… खरे स्वातंत्र्य तर २०१४ मधेच मिळाले

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल टिप्पणी करताना तिची जीभ घसरली आहे. बॉलीवूड अभिनेत्री टाइम्स नाऊ समिट २०२१ मध्ये बोलत असताना, तिने स्वातंत्र्य लढ्याबद्दल वक्तव्य केले आणि सांगितले की, “भारताला १९४७ मध्ये ‘भीक’ (भिक्षा) म्हणून स्वातंत्र्य मिळाले आणि ‘खरे स्वातंत्र्य’ २०१४ मध्ये आले.”

तिचा समिटमधील व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका व्हायरल क्लिपमध्ये, ती बोलताना दिसते की, “ स्वातंत्र्यवीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई किंवा नेताजी बोस यांच्या योगदानाकडे बघा… या लोकांना माहित होतं की रक्त वाहिल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. पण ते भारतीय रक्त नसावे. हे त्यांना माहीत होते. त्यांनी अर्थातच बक्षीस दिले. ‘वो आझादी नहीं थी, वो भीक थी. और जो आझादी मिली है वो २०१४ मै मिली है.’ (ते स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती. आणि आम्हाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.)

अनेक नेटिझन्स कंगनाच्या टिप्पण्यांवर टीका करत आहेत आणि अनेकांनी ‘भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान’ केल्याबद्दल तिच्यावर टीका करण्यात आली आहे. अनेक युजर्सने तर तिची पद्मश्री परत घेतली पाहिजे असे म्हटले आहे. कंगनाला ८ नोव्हेंबर रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती म्हणाली होती की राष्ट्रीय मुद्द्यांवर तिच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार आहे.

हे ही वाचा:

WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…

राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

त्याचबरोबर अनेक नेटिझन्सनी कंगनाची या विधानाचे समर्थनही केले आहे. कंगनाची बोलण्याशी आम्ही सहमत आहोत, कंगना जे बोलली त्यात काहीच चूक नाही, आजवर केवळ अहिंसावादी स्वातंत्र्यलढाच आम्हाला शिकवलं गेला. अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी कंगनाची समर्थनार्थ दिल्या आहेत.

Exit mobile version