भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा

भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा

कोविड लसीकरणाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करताना भारताने वीस कोटी पेक्षा अधिक लसीकरण करण्याचा एक अनोखा टप्पा पार केला आहे. लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून अवघ्या १३० दिवसात भारताने हा मैलाचा टप्पा पार केला विशेष म्हणजे अमेरिकेनंतरचा भारत हा दुसरा देश ठरला आहे. ज्याने २० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.

जगभरात कोविडची दुसरी लाट सुरू असताना त्याचा फटका भारतालाही बसला आहे. या महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून त्या क्षेत्रात भारताने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. बुधवार, २६ मे रोजी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार भारताने कोविड १९ लसीकरणाच्या बाबतीत २० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.

हे ही वाचा:

३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास

ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय

रा.स्व.संघाच्या सेवाकार्याने कम्युनिस्टांना पोटदुखी

शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

१६ जानेवारी २०२१ ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली असून ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. त्यातच आता भारताने अवघ्या १३० दिवसात २० कोटींपेक्षा अधिक लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. हे करणारा भारत हा दुसरा देश असून भारताआधी केवळ अमेरिकेने हा टप्पा ओलांडला आहे. त्यासाठी अमेरिकेला १२४ दिवसांचा कालावधी लागला.

भारतात आत्तापर्यंत एकूण २०,०६,६२,४५६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून, या मात्रांपैकी १५,७१,४९,५९३ पहिली मात्रा तर ४,३५,१२,८६३ दुसरी मात्रा दिली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३४ टक्के व्यक्तींना लसीची किमान १ मात्रा मिळाली आहे. तर भारतातील ६० पेक्षा जास्त वय राहत असणाऱ्या ४२ टक्क्यांहून अधिक नागरिकांना लसीची किमान १ मात्रा मिळाली आहे.

Exit mobile version